चाणक्य नीति मराठी (Chanakya Niti in Marathi) :
आचार्य चाणक्य चंद्रगुप्त मौर्य यांचे व पुर्ण मौर्य साम्राज्याचे सरचिटणीस होते, ते कौटिल्य या नावाने देखील ओळखले जात. त्यानी आपल्या बुद्धिमत्तेने आणि कौशल्याने नंदवंशचा नाश केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा बनविले. त्यांनी चाणक्य नीति ग्रंथ लिहिले ज्यामध्ये अर्थशास्त्र, शेती, समाजशास्त्र, राजकारण इत्यादी सर्व विषयांशी संबंधित महत्वाची माहिती दिली गेली. हे समजून घेतल्यास, एखादी व्यक्ती आपले जीवन सुलभ करू शकते.
जीवन यशस्वी करण्यासाठी चाणक्य नीतिचे बरेच मार्ग दिले आहेत. आचार्य चाणक्य यांनी कार्यक्षम नेतृत्त्वाचे अनेक मार्गही दाखवले आहेत. चंद्रगुप्त मौर्य कुशल नेत्यापासून एखाद्या राजा होण्यापर्यंत आचार्य चाणक्य यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जर तुम्हाला देखील यशस्वी व्यक्ती किंवा कुशल नेते व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हालाही आपल्या चुकांकडे लक्ष द्यावे लागेल आणि त्या चुकांमधूनही बोध घ्यावा लागेल.
चाणक्य नीतिनुसार आपण केवळ आपल्या चुकांमधूनच नव्हे तर, इतरांच्या चुकांमधूनही शिकले पाहिजे. जर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष दिले तर तुम्हाला यशस्वी नेता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. चाणक्य नीतिनुसार, एक यशस्वी नेता होण्यासाठी आपण आपल्या कर्माकडे लक्ष दिले पाहिजे. कर्मांनीच माणसाचे नशिब तयार होते, त्याचप्रमाणे तुम्हाला त्याचे फळही मिळते.
चाणक्य नीति सुविचार मराठी | Best Chanakya Niti Suvichar in Marathi :
जो माणूस आपली निंदा शांतपणे ऐकून घेतो, तो सर्व काही जिंकू शकतो. – चाणक्य
कधीही वाईट लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका, त्यांचा मूळ स्वभाव जात नाही कारण, वाघ हिंसा करायच सोडत नाही. – चाणक्य
एक आंधळ्या व्यक्तीला आरसा देणे व्यर्थ आहे त्याचप्रमाणे एका मुर्खाला पुस्तक देणे व्यर्थ आहे. – चाणक्य
जेव्हा भीती आपल्या जवळ येईल तेव्हा हल्ला करा आणि त्याचा नाश करा. – चाणक्य
माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटे मरतो ते आपल्या कर्मानुसार आनंद आणि दुःख भोगुण तो नरकात किंवा स्वर्गात जातो. – चाणक्य
Read More : लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi
शिक्षण प्राप्त करणे हे तपस्यासारखे आहे म्हणून घर आणि मायाची बलिदान करणे आवश्यक आहे. – चाणक्य
सिंहांला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणतीही सभा घेतली जात नाही, तो स्वता:च्या गुणाने अणि पराक्रमाने राजा बनतो. – चाणक्य
व्यक्ती त्याचा जन्मापासून महान होत नाही, तो त्याचा कर्माने महान होतो. – चाणक्य
इतरांच्या चुकांपासून शिका. कारण सर्व चुका स्व:ता करुन शिकण्यासाठी आमच्याकडे जास्त वेळ नाही. आयुष्य खूप लहान आहे. – चाणक्य
आपल्याला काय पाहिजे आहे ते आपण आपल्या प्रयत्नापासून प्राप्त केले पाहिजे. हे आपण एक वाघापासून शिकले पाहीजे. – चाणक्य
स्त्रियावर वाईट नजर ठेवणारे व्यक्ती कधीही पवित्र असू शकत नाही. – चाणक्य
उंच इमारतीवर कावळे बसले असले तरी त्याला गरुड म्हणता येणार नाही त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचा आदर त्याच्या गुणांद्वारे निश्चित केला जातो, परंतु त्याच्या उंची, स्थिती किंवा संपत्तीवर नाही. – चाणक्य
Read More : स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार | Swami Vivekananda Quotes in Marathi
निर्दोष व्यक्तीला शिक्षा देवून तुम्ही एक नविन शत्रू बनवता. – चाणक्य
साप जरी विषारी नसला तरीही तो स्वत:ची सरंक्षणासाठी विषारी असल्याचे दर्शविणे आवश्यक आहे. – चाणक्य
दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते त्याचप्रकारे आपण चांगल्या लोकांबरोबर ही मैत्री करून चांगले होऊ शकतो म्हणूनच आपण चांगल्या लोकां संगे मैत्री केली पाहिजे. – चाणक्य
नास्तिक लोकांना मित्र नसतात, साहसी लोकांना मरण्याचे भय नसते, आत्म-संतुष्टी ही सर्व सुखांची आई आहे. – चाणक्य
Read More : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार | Dr. APJ Abdul Kalam Quotes in Marathi
ज्या व्यक्तीला पैशाचा हव्यास आहे त्याला पैसा देऊन, अहंकारी व्यक्तीला हात जोडून, मुर्खाची गोष्ट मान्य करून आणि विद्वानाला सत्य बोलून वश करता येऊ शकते – चाणक्य
जन्मापासून येणारी स्वभाव बदलत नाहीत तथापि, कडु लिंबाचा झाडावर दुधाची अभिषेक केला तरी कडुलिंब हे कडुलिंबच राहणार ते गूळ बनणार नाही. – चाणक्य
सर्वात मोठा गुरु मंत्र आहे की, कधीही आपले रहस्य कुठेही सामायिक करू नका हे तुम्हाला नष्ट करेल. – चाणक्य
शरीरापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला फक्त एक रात्र आनंद देऊ शकते परंतु हृदयापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला आयुष्य भर आनंदी ठेवते. म्हणून मनाने सुंदर असलेल्या स्त्री संगे लग्न करणे योग्य आहे. – चाणक्य
सोन्याचे चार प्रकारे परीक्षण केले जाते : उजळणे, तोडने, गरम करणे आणि मारणे. त्याचप्रमाणे, माणसाला त्याग, गुण, वागणूक अणि आचरण हा चार गोष्टीवर परीक्षण केले जाते. – चाणक्य
कसे एक दारू पिण्यारी व्यक्तीला बरोबर किंवा चूक याची जाणीव नसते, त्याचप्रकारे स्वार्थी व्यक्तीला बरोबर किंवा चूक समजत नाही. – चाणक्य
प्रथम लहान काम पूर्ण करून सर्वात मोठे कार्य साध्य करता येते. हे रागाच्या जंगली हत्तीला पकडण्यासाठी वापरली जाणारा जाड रस्सी सारखे आहे. – चाणक्य
फुलांचा सुगंध केवळ वाराच्या दिशेने पसरतो. चांगल्या व्यक्तीची गुणवत्ता सर्व दिशांमध्ये पसरतो. – चाणक्य
देव हा दगड, लाकूड, मातीच्या मूर्ती मध्ये नाही तो आमच्या विचारात आहे. – चाणक्य
शिक्षण एक चांगला मित्र आहे, ज्ञानी व्यक्तीला सर्वत्र आदर मिळतो, तरुण आणि सौंदर्यपेक्षा शिक्षण श्रेष्ट आहे. – चाणक्य
एका कामगाराला सुट्टीच्या वेळेत परीक्षण केले पाहिजे, मित्र आणि नातेवाईकांना संकट आल्यावर परीक्षण केले पाहिजे परंतु पत्नीला घरात गरीबी आल्यावर परीक्षण केले पाहिजे. – चाणक्य
जो माणूस आपल्या कुटुंबाला जास्त जुळूवून आहे, तो जास्त भयभीत असतो आनंदी राहण्यासाठी Attachments ला सोडले पाहिजे. – चाणक्य
प्रत्येक मैत्रीच्या माघे एक न एक स्वार्थ लपलेले असते, बिना स्वार्थीपणाची मैत्री नाही हे एक कडू सत्य आहे. – चाणक्य
मुलांना फक्त पाच वर्षापर्यंत प्रेम केले पाहिजे, त्यांना दहा वर्षापर्यंत आज्ञेत ठेवून मोठे केले पाहिजे परंतु जेव्हा मुले 16 वर्षाच्ये होतात तेव्हा त्यांना मित्रांसारखे वागवले पाहिजे. – चाणक्य
जे आपल्या मनात आहे, ते किती दूर असले तरी हे नेहमीच जवळ असते जे आपल्या मनात नाहीत, ते किती जवळ असले तरी लांबच राहते. – चाणक्य
जुन्या आठवणी मध्ये विसरून जाऊ नका, तुम्हाला पुढे जायचे आहे त्यासाठी आत्ता जे आवश्यक आहे ते करा. – चाणक्य
तुम्ही एका लोभी व्यक्तीला पैसा देवून तुमचा अधीन करू शकता, जर तुम्हाला एका चांगल्या व्यक्तीला तुमचा अधीन करुन घ्यावे लागले तर तुम्हाला सत्य बोलावे लागेल. – चाणक्य
भूतकाळात जे घडले त्यामुळे दु:खी होऊ नका,चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमानकाळाचा सदुपयोग,भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे. – चाणक्य
दान दारिद्र्याला नष्ट करते, चांगला वागणूक समस्याला नष्ट करते, ज्ञान अज्ञानला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करते. – चाणक्य
ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे असा व्यक्ती गरीब असतो, ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे, त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही – चाणक्य
आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram