बहिणी भाऊ साठी स्टेटस मराठी | Best Brother & Sister Relationship Quotes in Marathi

बहिणी भाऊ साठी स्टेटस मराठी (Brother Sister Quotes in Marathi) :

आईच्या नंतर निःस्वार्थी प्रेम करणारे कोणी असेल तर ती फक्त बहीणच असते आणि वडीलानंतर कोणी पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा कोणी असेल तर तो भाऊ असतो. बहिणीचे प्रेम सैदव आपल्या भावासाठी देवांनी दिलेली अत्यंत मौल्यवान भेटवस्तु आहे. भाऊ-बहिणीचे नाते खूप अनोखे आणि प्रेमळ आहे. एकमेकांशी भांडणे करणे असो अथवा सुख दुःखात एकमेकांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहणे असो हेचं भाऊ आणि बहीण यांच्यातील एक अतिशय सुंदर नात आहे.

रक्षाबंधनाचा दिवशी हे नाते आणखी दृढ करते. ज्या दिवशी सासरी जाताना बहिण निरोप घेते, त्या दिवशी तिचा भाऊ सर्वात जास्त रडतो. कारण तो आपला लहानणापासूनच्या मैत्रिणीला आपल्या पासुन दुर करत असतो. एक भाऊ आपल्या बहिणीच्या सन्मान आणि संरक्षणासाठी नेहमीच तयार असतो. एक भाऊ स्वत: सर्व दुःख सहन करेल परंतु आपली बहिण नेहमी आनंदी राहावी हीच त्याची देवाकडे प्रार्थना असते. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी Sister Quotes In Marathi & Brother Quotes in Marathi घेवुन आलो आहोत.

 

बहिणी साठी स्टेटस मराठी | Sister Status in Marathi :

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते,
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.


जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते,
नेहमी माझ्या मनाला ताईला भेटण्याची आस असते.


मानलेल्या बहीण भावाचं नात हे रक्ताचं नसल तरी
ते रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप श्रेष्ठ असतं,
जे फक्त सुखात नाही तर दुःखात साथ देत
तेच खर बहीण भावाचं नात असत.


प्रत्येकाला एक बहीण असावी,
मोठी असेल तर आईबाबांपासून वाचवणारी
लहान असेल आपल्या पाठीमागे लपणारी.


कधी भांडते तर कधी रुसते तरीही न सांगता
प्रत्येक गोष्ट समजते हो गोष्ट फक्त बहिनच ठेवते.


अजून वाचा : आई वडील स्टेटस मराठी | Best Mom & Dad Status in Marathi


बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,
बंध असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी.


सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया
वेड्या बहिणीची वेडी माया.


नात हे प्रेमाचं नितळ अन निखळ मी सदैव जपलंय
हरवलेले ते गोड दिवस त्यांच्या मधुर आठवणी
आज सार सार आठवतंय हातातल्या राखीसोबत
ताई तुझं प्रेम मी साठवलय.


अजून वाचा : बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश


सासरी जाताना मिठी मारून रडणारी,
नाही तुला आता ओरडणार असं रडत रडत म्हणणारी,
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी बहीण असावी,
जीवापाड जपणारी आणि खूप प्रेम करणारी.


तू माझी बहीण मी तुझा भाऊ
प्रेमाचं आपलं नातं आयुष्यभर अतूट ठेवू.


आपली ताई तिला आहे खूपच घाई
प्रश्न काही विचारल्यावर सांगले मला आता वेळ नाही.


मनात ठेवण्याऐवजी मन मोकळे करण्याची एक हक्काची जागा
म्हणजे बहीण.


आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण असते.


कितीही रागावलीस ताई तरी बंध रेशमाचे तोडू नको,
वेडा आहे तुझा भाऊ त्याला एकटं सोडू नको.


बहीण ही फक्त बहीण नसते तर ती तुमची सुख दुःखाची साथीदार असते.


ताई तू सासरी गेली पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो रक्षाबंधनाची वाट पाहतो.


काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम,
आठवण करून देत राहील.
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलंच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल.


कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं खूप खूप गोड आहे.


 

भावा साठी स्टेटस मराठी | Brother Status in Marathi :

रडवायचं कसं आणि
रडून झाल्यावर बहिणीला हसवायचं कसं
हे फक्त भावालाच जमत.


फक्त भाऊच असतो जो वडीलांसारखे प्रेम
आणि आई सारखी काळजी करतो.


भाऊ लहान असो अथवा मोठा बहिणींच्या आयुष्यातील
त्याचे स्थान कायम अढळ आणि मोठं असत.


अजून वाचा : भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश


प्रत्येक बहिणीला तिचा भाऊ तिच्यासाठी प्रिन्स असतो
म्हणूनच तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय करमेना.


भाऊ म्हणजे एक आधार एक विश्वास
एक आपुलकी आणि एक अनमोल साथ आयुष्यभराची.


भाऊ आणि बहिणीच्या प्रेमात बस एवढाच अंतर असतो.
रडवून हसवतो तो भाऊ असतो आणि रडवून ती स्वतःही रडते
ती बहीण असते.


नशीबवान असतात त्या बहिणी ज्यांच्याकडे काळजी घेणारा भाऊ असतो.


भाऊ कसाही असू दे
पण बहिणीच्या काळजाचा तुकडा असतो तो.


सगळी नाती तुटून जातील
पण भाऊ बहिणीचं नातं मरे पर्यंत राहतं.


 

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Rakshabandhan Wishes in Marathi :

थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


मानलेल्या बहीण भावाचं नात हे रक्ताचं नसलं तरी
ते रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप श्रेष्ठ आहे,
जे फक्त सुखात नाही तर दुःखात साथ देत
तेच खर बहीण भावाचं नात आहे.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम
आठवण करून देत राहतात.
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलंच तर त्याला आधी
मला सामोरे जावे लागेल.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला.
आयुष्यात कुठल्याही क्षणी, कुठल्या ही वळणावर,
कुठल्या ही संकटात हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा


राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा.
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा !!


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात,
अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ,
माझ्या जीवनाचा हरेक क्षण तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल,
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वासच तो सदैव उरलेला असेल
रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा


ताई तू सासरी गेली पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो रक्षाबंधनाची वाट पाहतो.
राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ताई


श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
भाऊ, तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे, राखी एक विश्वास आहे,
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र मी तुला देऊ इच्छितो.


पुन्हा मांडू भातुकली अन् पुन्हा खेळ खेळू रडीचा
सण हा भाऊ-बहिणीतील निरागस नात्याचा
जगा दाखवू भाव मनीचा
रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा


कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं खूप खूप गोड आहे.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,
बंध असूनही बंधन हे थोडेच या तर हळव्या रेशीम गाठी
रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा


रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा.
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

You cannot copy content of this page
Copy link
Powered by Social Snap