काजू खाण्याचे फायदे आणि नुकसान | Top Cashew Nut Benefits in Marathi

काजू खाण्याचे फायदे | Cashew Nut Benefits in Marathi :

ड्राय फ्रूट्स (Dry Fruits) चा विषय निघतो, तेव्हा त्यात प्रामुख्याने आपल्या डोळ्यांसमोर एक नाव येते तर ते म्हणजे काजूच. कारण काजू हे ड्राय फ्रूट्स मधील एक प्रमुख घटक आहे आणि पौष्टिक घटकांच्या बाबतीत पण इतरांच्या तुलनेत अधिक फायदेशीर आहे. हे मिठाई असो, खीर असो किंवा लाडू असो विविध प्रकारचे व्यंजनामध्ये काजुचा वापर केला जातो. कोणत्याही व्यंजनात पडल्याने त्याची चव अधिक रुचकर होते. एवढेच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने अनेक काजू खाण्याचे फायदे (Kaju Benefits in Marathi) देखील आहेत.

अजून वाचा : सर्वोत्कृष्ट 5 ड्राय फ्रूट्स आणि त्यांचे फायदे | Top 5 Dry Fruits Benefits in Marathi

काजू खाण्याचे फायदे आणि नुकसान | Cashew Nut Benefits in Marathi

 

काजूचे पौष्टिक तत्व – Cashew Nut Nutritional Value in Marathi :

 • कॅलरी (Calories)
 • फट्स (Fats)
 • सोडियम (Sodium)
 • पोटॅशियम (Potassium)
 • कार्बोहाइड्रेट्स (Carbohydrates)
 • साखर (Sugar)
 • प्रोटीन (Protein)

 

काजू खाण्याचे फायदे (Cashew Nut Benefits in Marathi) :

वजन नियंत्रित करता येते :

वजन नियंत्रित करण्यासाठी काजूचे सेवन करणे हे फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. खूप साऱ्या डाएट प्लॅन मध्ये काजूंचा समावेश असतो. कारण यात मुबलक प्रमाणात फायबर आढळते आणि फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्याने भूक लागण्याचा कालावधी मंदावेल आणि तसेच पोट अधिक काळ भरलेल्याची जाणीव भासेल. अश्याने तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात आणण्यास मदत होते.

अजून वाचा : वजन कमी करण्याचे घरगुती उपाय | Weight Loss Tips in Marathi

 

काजू त्वचेसाठी फायदेशीर :

काजूमध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळतात. हे दोन्ही घटक त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर अनेकदा दिसून येत असतो. परंतू काजू हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, त्यात असलेले पौष्टिक घटक तुमच्या चेहऱ्याला सुरकुत्यापासूनह दूर ठेवतात. काजूच्या रोजच्या सेवनाने त्वचेच्या अनेक समस्या दूर करता येऊ शकते.

अजून वाचा : कोरफड खाण्याचे फायदे | Benefits of Eating Aloe Vera in Marathi

 

रक्तदाब नियंत्रित करते :

काजूमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते आणि पोटॅशियम प्रमाण अधिक असते. जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. जेव्हा सोडियमचे प्रमाण जास्त असते तेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण अधिक काळ टिकून राहते, ज्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित होते.

अजून वाचा : आहारात सोडियमचे (मिठाचे) प्रमाण कमी केल्याचे 20 फायदे

 

हिरड्या आणि दात निरोगी ठेवते :

आपल्या जीवनात दातांचे मोल खूप अधिक आहे. त्यामुळे ते पूर्णपणे मजबूत आणि स्वस्थ निरोगी ठेवणे तेवढेच महत्वाचे आहे. काजू हे तुमचे दात आणि हिरड्या दोन्ही निरोगी ठेवण्याचे काम करते. त्यात असलेले कॅल्शियम दातांसाठी खूप महत्वाचे मानले जाते. जर तुम्ही दात आणि हिरड्यांशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर काजूचे सेवन नक्की करावे.

अजून वाचा : लवंग खाण्याचे फायदे | Benefits of eating Cloves in Marathi

 

मेंदूच्या विकासासाठी मदत होते :

काजूमध्ये चांगल्या प्रमाणात मॅग्नेशियम असते आणि हेच मॅग्नेशियम मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत करण्यास मदत करते. तसेच मेंदूला होणारी इजा रोखण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावू शकते. याव्यतिरिक्त, मॅग्नेशियममध्ये एन्टीडिप्रेसस गुणधर्म असतात, जे उदासीनता म्हणजेच डिप्रेशन दूर करण्यास मदत करू शकतात. म्हणून अशा प्रकारे, काजूमध्ये असलेले मॅग्नेशियम मेंदूच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतात.

 

केसांच्या समस्या सोडवते :

जर तुम्ही केसांशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल, तर काजूचे सेवन तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम सिद्ध होईल. खरं तर काजूमध्ये मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस आणि झिंक सारख्या पौष्टिक घटक आढळतात. जे केसांसाठी देखील खूप महत्वाचे आहेत. याच कारणामुळे काजूचे सेवन केल्याने केस मजबूत होतात आणि घनदाट केस मिळवू शकता.

अजून वाचा : केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय | Hair Growth Tips in Marathi

 

डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते :

काजूमध्ये अँटीऑक्सिडंट पिंगमेंट असते ज्याला Zeaxanthin म्हणतात, जे आपल्या डोळ्यांच्या रेटिनासाठी चांगले असते. काजू हे आपल्या डोळ्यांना हानिकारक यूव्ही किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करते. हे अँटीऑक्सिडंट पिंगमेंट नैसर्गिकरित्या डोळ्यांमध्ये आढळतात आणि हानिकारक प्रकाश आणि इतर समस्यांपासून संरक्षण करतात.

 

हाडे मजबूत ठेवतात :

काजूमध्ये असलेले व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, तांबे आणि फॉस्फरस हे सर्व मिळून हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे त्यांना अस्थिरोग होण्याची शक्यता कमी होते. हाडांच्या आरोग्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे, काही वेळा आपले शरीर फॉस्फरससह हाडांची रचना तयार करण्यासाठी वापरले जाते.

 

काजू किती खावे ?

जर तुम्ही काजूचे नियमित सेवन केले तर तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच दिसून येतील. परंतु यामध्ये खाताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल की तुम्ही ते फक्त ठराविक प्रमाणात सेवन केले पाहिजे. तुम्ही रोज दिवसाला 4-6 काजू खाऊ शकता, ते तुमच्या आरोग्यला कोणतेही नुकसान करणार नाही.

 

काजूचे तोटे (Side Effects of Cashew Nut In Marathi) :

 • काजूमध्ये अधिक प्रमाणात फायबरची मात्रा असते, जे तुमचे पोट स्वच्छ ठेवण्याचे काम करते. परंतु त्याचे अधिक प्रमाणात सेवन केले तर अतिसार ह्या सारख्या समस्या उद्भवू शकतील.
 • काजूमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे अधिक प्रमाणात काजू खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते. म्हणून काजूचे प्रमाण सुनिश्चित ठेवूनच सेवन केले पाहिजे.
 • जर तुम्ही डोकेदुखी किंवा मायग्रेन सारख्या आजारांपासून त्रस्त असाल तर काजूचे सेवन अजिबात करू नये, कारण काजूमध्ये असलेले अमीनो ऍसिड हे डोकेदुखी आणि मायग्रेनच्या समस्येला कारक ठरू शकते.
 • काजू अधिक प्रमाणात सेवन करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. काजूमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. जास्त प्रमाणात खाल्ल्याने उच्च रक्तदाब देखील होऊ शकतो.

 

लक्षात ठेवा :

काजूचे फायदे (Cashew Nut Benefits in Marathi) असले तरी, त्याचे थोड्या प्रमाणत काजूचे तोटे (Side Effect of Cashew Nut in Marathi) देखील आहे. हा लेखात आम्हीं सामान्य माहिती सादर केली गेली आहे. कृपया अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: