सीताफळ खाण्याचे फायदे आणि तोटे (Custard Apple Benefits in Marathi) :
सीताफळ हे एक फळ आहे. जे हिवाळ्याच्या काळात बाजारात उपलब्ध होते. इंग्रजीत सीताफळला “कस्टर्ड अँपल” (Custard Apple) असे म्हणतात आणि तसेच हे फळ “शरीफा” या नावानेही ओळखले जाते. औषधांमध्ये सीताफळचा समावेश अगणित आहे.
सीताफळ मध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, राइबोफ्लेविन, थायमिन, नियासिन इत्यादी मुबलक प्रमाणात असतात. कस्टर्ड सफरचंद म्हणजे सीताफळ पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस देखील समृद्ध आहे. त्यात इतर फळांपेक्षा लोह (Iron) देखील जास्त असते. आरोग्यासाठी सीताफळ खाण्याचे फायदे (Health Benefits of Custard Apple in Marathi) आहेत.
सीताफळ खाण्याचे फायदे (Custard Apple Benefits in Marathi)
हृदय निरोगी राहते :
सीताफळमध्ये उपस्थित पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयासाठी खुप फायदेशीर आहेत. ते हृदय रोगापासून व इतर हृदया संबंधित आजारापासून बचाव करते. सीताफलमध्ये मुबलक प्रमाणात असलेलं फायबर हे रक्तदाब कमी करते आणि कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते.
अजून वाचा : आहारात सोडियमचे (मिठाचे) प्रमाण कमी केल्याचे 20 फायदे
दात आणि हिरड्या फायदेशीर असते :
सीताफळ दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहेत. यात आढळणारे कॅल्शियम हे दात मजबूत बनवते. सीताफलच्या झाडाच्या सालात सापडलेल्या टॅनिनमुळे दात आणि हिरड्या यांना फायदा होतो. त्याची साल बारीक वाटून ब्रश केल्याने हिरड्या आणि दातदुखीमध्ये आराम मिळतो. यामुळे तोंडाचा दुर्गंधीच्या समस्येपासून मुक्तता करते.
अजून वाचा : लवंग खाण्याचे फायदे | Benefits of eating Cloves in Marathi
अशक्तपणा दूर करते :
शरीराची दुर्बलता दूर करण्यासाठी सीताफळ खाणे आवश्यक मानले जाते. सीताफळ मध्ये मॅग्नेशियमच्या प्रमाणात उपलब्धतेमुळे शरीरातील अशक्तपणा आणि बिघडलेले कार्य देखील दूर केले जाऊ शकते. सीताफळ सेवन केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखता येते. तसेच, त्याचा उपयोग शरीरातील सांध्यातील वेदना कमी करण्यास देखील मदत करते.
डोळ्यांसाठी फायदेशीर असते :
सीताफळमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि आवश्यक राइबोफ्लेविन घटक असतात, जे डोळ्यांची शक्ती (नजर) संतुलित ठेवतात. डोळे निरोगी ठेवण्या बरोबरच डोळ्यांशी संबंधित विविध रोगांशी लढायला संरक्षण देण्यासाठी सीताफळचे सेवन खूप फायदेशीर ठरले जाते.
पचन क्षमता मजबूत करते :
आपल्याला बद्धकोष्ठता, गॅसची समस्या असल्यास, आपल्या पाचन तंत्राचे कार्य योग्यरित्या होत नसल्यास, अशा परिस्थितीत सीताफळ खाणे खुप उपयुक्त ठरते. सीताफळमध्ये उपस्थित असलेलं घटक शरीरातील पाचन तंत्राला बळकटी देण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, वजन कमी होण्याच्या समस्येवर अळा घालते.
अजून वाचा : अॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार
रोगप्रतिकार क्षमता वाढते :
सीताफळ मध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडेंट असतात. जे आपल्या शरीरात अनेक आजारां विरुद्ध लढण्यासाठी सामर्थ्य देतात. हे आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते आणि शरीर निरोगी आणि मजबूत करते.
अजून वाचा : रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी ?
दम्याचा प्रतिबंध करते :
सीताफळ मध्ये व्हिटॅमिन बी 6 असते. जे दम्याच्या त्रासा पासून रुग्णांना मुक्तता करते. यात ब्रोन्कियल इन्फेक्शन पासून संरक्षण करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामध्ये उपस्थित असलेलं मॅग्नेशियम हृदय रोगाच्या झटक्या पासून हृदयाचे रक्षण करते.
मधुमेहामध्ये फायदेशीर ठरते :
सीताफळ मधील फायबर शुगरचे प्रमाण कमी करते. त्यामुळे टाइप -2 मधुमेहाचा धोका कमी होतो. जर तुम्हाला मधुमेह नियंत्रित करायचा असेल तर सीताफळ खाणे लाभदायक ठरते.
अजून वाचा : गुळवेलचे फायदे | Top 8 Benefits of Giloy in Marathi
रक्तात हिमोग्लोबिन वाढवते :
जर शरीरात हिमोग्लोबिन कमी होत असेल, तर सीताफळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण या फळा मध्ये लोहाचा समावेश अधिक आहे, जे रक्ताची कमतरता पूर्ण करते, म्हणून ज्या लोकांना रक्त किंवा हिमोग्लोबिनची कमतरता असते. त्यांनी त्याचे नियमित सेवन केले पाहिजे. हे सीताफळ खाण्याचे फायदे आहेत.
त्वचासाठी लाभदायक असते :
चेहऱ्यावर चमक आणण्याच्या दृष्टीने सीताफळचे खूप फायदे आहे. त्यात व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडेंट्सची चांगली मात्रा असते, जे त्वचेला मुक्त रॅडिकल थांबवून त्वचेला वृद्धी होण्यापासून प्रतिबंध करते. तसेच, त्वचेतील चमक आणि मुलायम पणा टिकवून ठेवते. तसेच हे त्वचेला घट्ट करते जेणेकरून त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.
अजून वाचा : तुळशीचे फायदे | Top 12 Health Benefits of Tulsi (Basil) in Marathi
वजन वाढविण्यात मदत करते :
सीताफळाचा आणखी एक फायदा म्हणजे, ते वजन वाढविण्यात मदत करते. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी सीताफळ चांगले आहे. सीताफळ मध्ये घटक आवश्यक वजन आणि कॅलरी वाढवण्यास मदत करतात. हे सीताफळ खाण्याचे फायदे आहेत.
सीताफळ खाण्याचे तोटे (Custard Apple Disadvantages in Marathi)
- सीताफळमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याकारणाने त्याचा अधिक सेवनाने पोट संबंधित समस्या होऊ शकतात जसे की, ऍसिडिटी, अतिसार इत्यादी.
- सीताफळ मध्ये लोह चे प्रमाण अधिक असते. त्याचा अधिक सेवनाने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते, जास्त लोहामुळे पोटदुखी, उलट्या होणे, मळमळ येणे इत्यादीं समस्या उदभवू शकतात.
- सीताफळ जास्त प्रमाणात खाऊ नये. त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढू शकते.
- सीताफळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, त्याचे बियांचे सेवन करणे टाळावे कारण त्याचे बियाणे विषारी आहेत आणि यामुळे आपल्यास आरोग्यास त्रास होऊ शकतो. अश्यामुळे सीताफळ फळांचे सेवन केल्यास अलर्जी होऊ शकते. म्हणून अश्या व्यक्तींनी सीताफळचे सेवन करू नये.
लक्षात ठेवा :
सीताफळ खाण्याचे फायदे व तोटे या लेखात आम्हीं सामान्य माहिती सादर केली गेली आहे. जर आपल्याला कोणत्याही आजारचे निदान करण्यापूर्वी किंवा कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास कृपया प्रथम आपल्या डॉक्टरांचा किंवा विशेष तज्ञांचा सल्ला घेऊन सेवन करावे.
आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram