पु.ल देशपांडे यांचे सुविचार | Pu La Deshpande Quotes in Marathi

पु.ल देशपांडे (Pu La Deshpande) :

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे पु ल देशपांडे ऊर्फ भाई म्हणून प्रसिद्ध असलेले हे एक उत्तम लेखक, नाटककार, संगीतकार, अभिनेता आणि दिग्दर्शक ही होते. आज ही त्यांची नाटके लिखाण रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. म्हणून आज आम्ही पुल देशपांडे यांचे सुविचार संग्रह घेऊन आलो आहोत.

 

पु.ल देशपांडे यांचे सुविचार (Pu La Deshpande Quotes in Marathi)

जाळायला काही नसलं की, पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता ह्याच्यावर ते अवलंबून आहे, तुम्ही जर एखाद्याच मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील, पण माणुस हा गेलेली केस असु नये. –  पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रांपेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आठवते. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


Read More : लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi


प्रोब्लेम्स नसतात कोणाला ? ते शेवटपर्यंत असतात पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच आहे. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


खरं तर सगळे कागद सारखेच असतात, त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


जुन्यात आपण रंगतो, स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दुर करायचे काम करतात. फरक इतकाच की, औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही, त्याचा त्रास होतो. पण त्याही पेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही याचा होतो. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


माणूस अपयशाला भीत नाही, अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर याची त्याला भिती वाटते. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


क्रियापदाच मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेलं कर्म किती मोठ आहे ह्याच्यावर अवलंबून असते. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


Read More : स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार | Swami Vivekananda Quotes in Marathi


शेवटी काय हो, आपण पत्त्याच्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


मराठीला जी ‘मज्जा संस्था’ वाटते, तीच इंग्रजीला ‘नर्व्हस सिस्टीम’ वाटते फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


Read More : भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार | Gautam Buddha Quotes in Marathi


आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


कोडगेपणाचा अमर्याद विकास झाला की त्यातूनच स्वत:च्या पोरांना अमेरिकेला धाडून दुसऱ्याच्या पोरांना ”शासकीय मराठीत शिका” असा उपदेश करणारे पुढारी तयार होतात. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


Read More : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार | Dr. APJ Abdul Kalam Quotes in Marathi


जगात काय बोलत आहात ह्यापेक्षा कोण बोलत आहात ह्याला जास्त महत्त्व आहे. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय. ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्या नसण्याची पोकळी जाणवते. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं. – पु.ल. देशपांडे

whatsapp share button pic


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram
शेयर करा: